radhika shaha sakal
पुणे

Pune News : बारामतीच्या राधिका शहा यांना इटलीमध्ये जागतिक पारितोषिकाने गौरविले

या परिषदेसाठी जगभरातील 72 हून अधिक देशांतील एकात्मिक आरोग्य सदस्यांकडून शोधनिबंध प्राप्त झाले होते.

मिलिंद संगई, बारामती

बारामती - येथील राधिका मिलिंद शहा (वाघोलीकर) यांना इटलीमधील नेपल्स येथे झालेल्या 26 व्या जागतिक कॉंग्रेस ऑफ ओबेसिटी सर्जरी परिषदेत इंटिग्रेटेड हेल्थ रिसर्च अँवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

राधिका शहा यांनी सादर केलेल्या युवा पिढीतील लठ्ठपणावरील संशोधनाला इंटिग्रेटेड हेल्थ रिसर्च अँवॉर्डने सन्मानित केले गेले. विशेष म्हणजे जागतिक स्तरावर पहिल्या तीन संशोधनामध्ये राधिका यांच्या संशोधनाचा समावेश करण्यात आला आहे.

या परिषदेसाठी जगभरातील 72 हून अधिक देशांतील एकात्मिक आरोग्य सदस्यांकडून शोधनिबंध प्राप्त झाले होते. यातून राधिका यांच्या शोधनिबंधाची निवड करण्यात आली आणि त्याला पारितोषिक देत सन्मानित केले गेले.

राधिका शहा यांनी गेल्या काही वर्षात लठ्ठपणा, मधुमेह आणि पोषण या क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. तिने केलेल्या संशोधन व उपचार पध्दतीला जागतिक कॉंग्रेस ऑफ ओबेसिटी सर्जरी परिषदेत सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली.

जागतिक काँग्रेसमध्ये अशी संधी मिळविणारी ती पहिली भारतीय पोषणतज्ज्ञ बनली आहे. लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेच्या जागतिक काँग्रेसमध्ये तिने भारताचा नावलौकीक उंचाविण्याचे काम केले आहे. या अगोदरही राधिका यांना अमेरिकन सोसायटी ऑफ मेटाबॉलिक व बॅरिएट्रीक सर्जरी कॉन्फरन्समध्ये सन्माननीय वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

ज्यांचे वजन 100 किलोहून अधिक आहे अशा रुग्णांवर कशा प्रभावी पध्दतीने उपचार केले जातात, या एका वेगळ्या विषयावर त्यांना जागतिक कॉंग्रेसमध्ये सादरीकरण करत त्यांचे अनुभव जागतिक स्तरावर मांडण्याची संधी या निमित्ताने मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT