pune news
pune news  sakal
पुणे

Pune News: खळबळजनक घटना, १६ वर्षीय मुलीवर बिबटयाने केला हल्ला अन्

सकाळ वृत्तसेवा

Alefata: पिंपळवंडी या ठिकाणी एका १६ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.(alefata news)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळवाडी(ता.जुन्नर) येथील तोतर बेट मळ्यात रहात असलेले सुर्यकांत सखाराम तोतरे यांच्या शेतात ऊस मंगळवारी तोडणी चालु असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रितु शामराव गागुर्डे वय १६ वर्षीय या ऊसतोड महिला कामगारावर बिबट्याने अचाणक पणे येऊन हल्ला केला असता बाजुला असलेल्या ऊस तोड कामगारांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला.(maharashtra news)

परंतु या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात मुलीच्या पाठीवर व डोक्यावर जखम झाली असुन सदर मुलीला नारायणगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी वन विभागाचे वैभव काकडे,संतोष साळुंखे,बी.के.खरगे,रोशन नवले यांनी भेट दिली असुन या ठिकाणची ऊस तोडणी तातपुरती थांबविण्यात आली आहे.(health news)

दरम्यान आळेफाटा परिसरातील आळे,वडगाव आनंद,राजुरी,पिंपळवंडी,चाळकवाडी,वडगाव कांबळी,बोरी,जाधववाडी या गावांमध्ये बिबट्यांचे पाळीव प्राणी तसेच माणसांवर हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले असुन या परीसरात दररोज कुठे ना कुठे दुचाकी स्वार तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले असुन येथील नागरीकांना दिवसाही बिबट्याचे दर्शन होत आहे.(pune forest News)

त्यामुळे येथील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असल्याने‌ या परिसरातील प्रत्येक वाडी वस्तीवर वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT