Suresh Kalmadi 
पुणे

कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत सुरेश कलमाडींचा सहभाग चर्चेचा विषय ठरला. श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात झाली. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि कॉंग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी गणपतीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या सर्व राजकारण्यांनी एकत्र बसून नाश्‍ताही केला. सुरेश कलमाडी यांनी अनेक वर्षांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेला सहभाग अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासदार सुरेश कलमाडी यांना कॉंग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. कलमाडींच्या निलंबनानंतर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर पुण्यातील कॉंग्रेसच्या राजकारणाची सूत्रे पुन्हा कलमाडी यांच्याकडे सोपविण्यात येतील, अशी चर्चाही रंगली होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच कलमाडी यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधान व्यक्त केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर आज त्यांनी थेट भाजप नेत्यांबरोबर गणपती विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली. त्यामुळे सुरेश कलमाडी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. 

श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणूक सोहळ्याला महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे तसेच सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ही राजकीय मंडळी नाश्‍त्यासाठी एकत्र जमली. या वेळी कलमाडी आणि बापट एकाच टेबलावर बसले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या वेळी दोन्ही नेते एकमेकांशी फारसे बोलले नाहीत. मात्र, ही पुण्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीची नांदी असावी का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न झाला. या वेळी सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील राजकारणाविषयी काय वाटते, असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, त्यावर काहीही बोलण्यास कलमाडी यांनी नकार दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीची गृह विभागाकडून दखल; जिल्हा प्रशासन, पोलिसांचे मॅरेथॉन बैठक; अहवाल लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे

Vaishnavi Hagawane Case Update : नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण

Pune Crime : गोकुळनगरमध्ये तरुणावर कोयत्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT