पुणे

स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढण्याचा इशारा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पडणारा पाऊस आणि सरासरीपेक्षा कमी झालेला कमाल तापमानाचा पारा यामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी बुधवारी दिला. जानेवारीपासून आतापर्यंत 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. 

शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी उन्हाचा चटका वाढला होता. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने वाढला होता. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली होती. आता गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पावसाच्या सरी कोसळत आहेत. अत्यंत कमी दिवसांत वातावरणात झालेल्या या बदलांमुळे फ्लूसह स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाळी वातावरणात स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संतोष वाळूंजकर म्हणाले, ""वातावरणातील तापमानाचा पारा कमी झालेला आहे. त्याच वेळी हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. असे वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक ठरते. त्यामुळे या रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.'' 

शहरात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या सहा लाख 17 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ताप, थंडी, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणे असणाऱ्या 17 हजार रुग्णांना "टॅमिफ्लू' हे औषध देण्यात आले आहे. स्वाइन फ्लूची ठळक लक्षणे दिसणाऱ्या आणि गंभीर असणाऱ्या दोन हजार 300 रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 613 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. स्वाइन फ्लू झालेल्या 57 रुग्णांवर अद्यापही शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच 26 रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर ठेवण्यात आले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आतापर्यंत 91 मृत्यू 
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ""स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या मृत्यूची सविस्तर माहिती घेऊन त्याचे विश्‍लेषण केले जाते. त्यानंतर संबंधित रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे निश्‍चित होते. शहरात जानेवारीपासून आतापर्यंत 91 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

SCROLL FOR NEXT