पुणे

आज उल्कावर्षाव

सकाळवृत्तसेवा

पुणे - आकाशातील उल्कावर्षावाच्या आतषबाजीचा अलौकिक नजारा जगभरातील नागरिकांना पाहण्याची संधी आहे. येत्या शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्रीपासून ते शनिवारी (ता. १८) पहाटेपर्यंत नभांगणात सिंह राशीत आणि मघा नक्षत्राजवळून उल्कावर्षाव होताना पाहायला मिळणार आहे. अमावास्येची रात्र असल्याने काळोखात हा वर्षाव नयनरम्य दिसणार असला तरीही त्यासाठी शहरापासून आणि प्रकाश प्रदूषणापासून दूर जावे लागणार आहे.

रात्री बाराच्या सुमारास पूर्व दिशेने हा उल्कावर्षाव दिसणार आहे. पहाटेपर्यंत तासाला १५ ते २० उल्का कोसळताना दिसतील. या उल्कांचे आकारमान अगदी लहान असल्यामुळे त्या पाहण्यासाठी शहरापासून आणि प्रकाश प्रदूषणापासून जवळपास ५० ते ६० किलोमीटरवर जावे लागणार आहे. या वेळी पृथ्वी ‘टेम्पल टटल’ या धूमकेतूचा मार्ग ओलांडून जाणार असल्याने हा उल्कावर्षाव संपूर्ण जगभरात कोठूनही दिसू शकणार आहे. हा धूमकेतू तब्बल साडेतेहत्तीस वर्षांनी सूर्यमालेत येऊन सूर्याची परिक्रमा करतो. ही परिक्रमा करत असताना त्याच्या मार्गातून पृथ्वी जाते त्या वेळी पृथ्वीवरून उल्कावर्षाव दिसतो. धूमकेतूच्या धुराळाच्या मार्गातून पृथ्वी जाते त्या वेळी या धुराळातील कण पृथ्वीवर वेगाने पडतात. भूतलापासून जवळपास दीडशे किलोमीटर उंचीवर हे कण जळायला सुरवात होते आणि काही किलोमीटरपर्यंत हे कण पूर्णपणे जळून जातात. या कणरूपी उल्कांच्या वर्षावाची नयनरम्य रोषणाई नागरिकांना पाहायला मिळणार आहे. या वेळी उल्कावर्षाव सिंह राशीच्या दिशेतून पडत असल्याचे भासणार आहे. या खगोलीय आविष्कारास ‘लिओनिड्‌स’ असे म्हटले जाते, असे मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले.

उल्कावर्षाव पाहण्यासाठी हे करावे 
 आकाशाकडे पाहताना नजर पूर्व दिशेला सिंह राशीकडे असावी
 शहरापासून ५० ते ६० किलोमीटर दूर जाण्याची गरज
 अंधाऱ्या ठिकाणाची निवड करावी
 एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर गेल्यास उत्तम
 गच्चीवरून किंवा विस्तीर्ण मैदानातून उल्कापात पाहता येईल
 कोणत्याही उपकरणाशिवाय सहज डोळ्यांनी दिसेल
 दुर्बीण वापरू नये, कारण त्यामुळे थोडेच आकाश दिसेल

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT