Pune News
Pune News Sakal
पुणे

Pune News : बारामतीत वाहतूक विभागाची रिक्षा चालकांवर धडक कारवाई

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहरातील रिक्षा चालकांवर आज शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने धडक कारवाई केली. यात विविध कारणांसाठी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक सुनील महाडीक व फौजदार बाळासाहेब जाधव यांनी दिली.

रिक्षांचे बेशिस्त पार्किंग करणे, दोन रांगात रिक्षा लावून थांबणे, गणवेश, बँच बिल्ला यांचा वापर न करणे अशा कारणांसाठी आज पोलिसांनी कारवाई केली. अनेक रिक्षा आज शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आल्या होत्या. सर्व बाबींची खातरजमा करुन काही जणांना सोडून दिले गेले तर काहींवर खटले दाखल केले गेले. आज 14 रिक्षाचालकांवर कारवाई केली गेली. गणवेश व बँच बिल्ला यांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी रिक्षाचालकांना केले आहे.

दरम्यान अल्पवयीन मुले दुचाकी गाडी परवाना नसताना चालवितात, अशा 18 पालकांवर खटले दाखल करण्यात आले असून आता यात पाच हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्या मुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी देऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सदरची कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुनील महाडिक, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव तसेच पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव, अशोक झगडे, प्रकाश चव्हाण, हनुमंत घोळवे, अजिंक्य कदम, योगेश कांबळे, रेश्मा काळे, सीमा साबळे, रुपाली जमदाडे, स्वाती काजळे यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT