पुणे

स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या आजाराने 62 रुग्ण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

लोहगाव आणि करमाळा (जि. सोलापूर) येथील रुग्णांचा स्वाइन फ्लूवर पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पावसाळी वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

स्वाइन फ्लू झालेल्या सात रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, तर तीन रुग्णांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत शहरातील 314 जणांना स्वाइन फ्लू झाला आहे. लवकर निदान, योग्य उपचार आणि नियमित औषधोपचार यामुळे स्वाइन फ्लू पूर्ण बरा होतो. आतापर्यंत 243 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghav Chadha: आम आदमी पार्टीला जबरदस्त धक्का! राघव चढ्ढांचा राजीनामा; दोन तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये जाण्याची घोषणा

नागपूरमध्ये बनावट औषधांचा मोठा साठा उघड; सहा आरोपींवर गुन्हा दाखल, कसं उघडकीस आलं प्रकरण?

Beed Walmik Karad: ''सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर '' बीडच्या जेलमधून नवीनच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Viral Video : मी पण चाललो, तुम्ही पण निघा आता! मुंबई इंडियन्सचा पराभव दिसताच Akash Ambani यांनी चाहत्यांना केला इशारा

मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वृद्ध वडिलांना अमानुष मारहाण, लघवीही पाजली...

SCROLL FOR NEXT