पुणे

‘वसंतोत्सव’ प्रवेशिका आजपासून उपलब्ध

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ’ची प्रस्तुती असलेल्या यंदाच्या वसंतोत्सवाच्या प्रवेशिका मंगळवार (ता. १६) पासून उपलब्ध होत आहेत.

प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी, राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, वैभवशाली प्राचीन संगीत नाटकांच्या परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग, लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे फ्यूजन आणि तरुणाईचा आवडता सतारवादक निलाद्री कुमार यांचे वैशिष्ट्यपूर्ण सतारवादन ही यंदाच्या ‘वसंतोत्सवा’ची वैशिष्ट्ये.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे येत्या शुक्रवारपासून (ता. १९) हा तीन दिवसांचा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे हे अकरावे वर्ष आहे. यंदाही सर्व श्रोत्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र प्रवेशिका घेणे आवश्‍यक आहे. ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या या स्वरयात्रेसाठी ‘मराठे ज्वेलर्स’ असोसिएट पार्टनर आहेत. पॉवर्ड बाय ‘रावेतकर ग्रुप’ असलेल्या या उत्सवासाठी ‘हॅशटॅग’ आणि ‘महामेट्रो’ सहप्रायोजक, 

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. बॅंकिंग पार्टनर, ९१.१ एफएम रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, महेफिल केटरिंग सर्व्हिसेस, जनसेवा भोजनालय फूड पार्टनर, गिरिकंद हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, १००% पब्लिक रिलेशन्स पीआर पार्टनर, सेतू ॲडव्हर्टायझिंग कम्युनिकेशन पार्टनर आणि व्हाइट कॉपर प्रा. लि. एक्‍झिक्‍युटींग पार्टनर आहेत.

गुरुवारी कार्यशाळा
महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या ‘वसंतोत्सव विमर्श’मध्ये यंदा पं. योगेश समसी सहभागी होणार आहेत. गुरुवारी (ता. १८) सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत त्यांचे ‘पंजाब घराण्यातील तबलावादन’ या विषयावर सप्रयोग व्याख्यान होईल. त्यानंतर दुपारी तीन ते पाच या वेळेत त्यांची कार्यशाळाही होणार आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले असून, कार्यशाळा ३० विद्यार्थ्यांसाठी आहे. मात्र, इतरांना कार्यशाळेत श्रोता म्हणून उपस्थित राहता येऊ शकेल. यासाठी vasantotsav.vimarsha@gmail.com या ई-मेलवर किंवा ९४२२३०६०८८ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर नोंदणी करावी.

महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी मंगळवारपासून (ता. १६) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात मिळतील.

प्रवेशिका खुर्ची आणि भारतीय बैठक अशा दोन प्रकारांत आहेत. खुर्चीच्या प्रवेशिका केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी वितरित केल्या जाणार असून, प्रत्येकी दोन प्रवेशिका मिळतील. प्रवेशिका शिल्लक असेपर्यंत वाटप सुरू राहील.

प्रवेशिका असतील त्यांनाच महोत्सवासाठी प्रवेश मिळेल.

येथे मिळतील प्रवेशिका...
१. ‘सकाळ’चे मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, शनिवारवाड्याजवळ 
(०२० -२५५०५५००)
२. ‘सकाळ’चे शिवाजीनगर कार्यालय, २७, नरवीर तानाजीवाडी (०२०-२५६०२१००)
३. पुणे सिटी हॅशटॅग शॉप्स्‌
 बाय मोअर रिटेल, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ (९८२२४२२५९२) 
 भैरवनाथ एंटरप्राइझेस, रवी टेरेस, भारती विद्यापीठ, आंबेगाव बु. (९७६७३७२६००)
 अनुज फॅशन, पूना बेकरी शेजारी, सिंहगड रस्ता (९०११३०९७९२)
 कानिफनाथ टेक्‍स्टाईल, उरुळी देवाची फाटा, पुणे-सासवड रस्ता, फुरसुंगी (९०११६५७३९३)
 गजानन एंटरप्राइझेस, शॉप क्र. १, विजय सेल्स समोर, पौड रस्ता (८४५१०९०१६१) 
 अभिजित टेक्‍स्टाईल, आकाशवाणीसमोर, सोलापूर रस्ता, हडपसर (७०२८०२१२२४)
 गुरुकृपा असोसिएट्‌स मिलेनियम, पु. ना. गाडगीळजवळ, चापेकर चौक, चिंचवड (८४८४०७७७७७)
 परफेक्‍ट फॅशन, ग्रीन व्हॅली, कस्पटे वस्ती, वाकड (९९२१२७०५८५)
४. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पुढील शाखा ः
 गुरुगणेशनगर, ऋग्वेद हॉटेलजवळ, श्रेयस अपार्टमेंट्‌स, कोथरूड (०२०-२५३८९५२७)
 सहकारनगर, अजय अपार्टमेंट्‌स, तावरे कॉलनी, सहकारनगर (०२०-२४२३११००)
 नारायण पेठ, केसरी वाडा, न. चिं. केळकर रस्ता (०२०-२४४५२५३६)
 सेनापती बापट रस्ता, रत्ना मेमोरिअल हॉस्पिटलशेजारी (०२०-२५६८३०००)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT