file photo
file photo 
पुणे

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

दिलीप कुऱहाडे

पुणे: विमाननगर येथील रोहन मिथिला सोसायटीत हाऊस किपींगचे काम करणारी सोनी सिद्धु राठोड (वय 17, रा. इंदिरानगर, बर्मासेल) हिने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी एबीआर मॅनेजमेंट सोल्यूशन कंपनीचा पर्यवेक्षक जितेंद्र गायकवाड (वय 23, रा. गंगा ऑर्चीड, पिंगळेवस्ती, मुंढवा) याला विमानतळ पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांनी सांगितले.

या संदर्भात सोंडे म्हणाले, 'या बाबत कविता राठोड यांनी फिर्याद दिली आहे. कविता व सोनी या रोहन मिथिला सोसायटीत हाऊस किपिंगचे काम करत. गुरूवारी (ता. 15) सहाव्या मजल्यावर असताना संशयीत आरोपी गायकवाडने अश्‍लिल चाळे करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सोनीने कविताला दिली होती. तर कविताने सुद्धा सोनीला गायकवाड आपणासही त्रास देत असून, तुझ्यावर प्रेम करतो मात्र विवाह करणार नसल्याचे सांगितले होते. दोघींमध्ये चर्चा झाल्यानंतर सोनी ‘यु’ बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर गेल्यानंतर कविताने पडली, पडली म्हणून जोरात आवाज ऐकला. कविताने सहाव्या मजल्यावरून पाहिल्यानंतर सोनी खाली जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिचा दुपारी दोन वाजता ससून मध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा रात्री आठच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयीत आरोपी गायकवाडने सोनी राठोडची छेडछाड करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम गुन्हा दाखल केल्याची माहिती सोंडे यांनी दिली. अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक सी.एस. चौधरी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT