Pune Crime News sakal
पुणे

Pune :‘सणासाठी वर्गणी दे, अन्यथा.. ' खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

कोणीही जबरदस्तीने वर्गणीच्या नावाखाली खंडणीची मागणी केल्यास नागरिकांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सणाच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या टोळक्याने मोबाईल शॉपीमधील एका तरुणाला जबर मारहाण केली. त्यात या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.

रास्ता पेठेतील कादरभाई चौकाजवळ मोबाईल शॉपीमध्ये शनिवारी (ता. १५) हा प्रकार घडला. याप्रकरणी नावेद जाकिर अन्सारी (वय २४) या तरुणाने फिर्याद दिली आहे. तर, अमान इब्राहिम खान (वय २१) हमजा तसवर शेख (वय १९), हाफीज ऊर्फ हुजेफा इसाक शेख (वय २१), महम्मद वसीम खान (वय १९, सर्व रा. सत्तार चाळ, नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोबाईल शॉपीमधील तरुणाला ‘सणासाठी वर्गणी दे, अन्यथा दुकान फोडू,’ अशी धमकी दिली. फिर्यादी तरुण आणि त्यांच्या भावाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर आरोपींनी गॅरेजमधील पान्ह्याने तरुणाच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

फरासखाना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे आणि त्यांच्या पथकाने खंडणीखोरांना जेरबंद केले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक लोणारे करीत आहेत.

खंडणी मागितल्यास पोलिसांना कळवा

कोणीही जबरदस्तीने वर्गणीच्या नावाखाली खंडणीची मागणी केल्यास नागरिकांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT