Bribe case
Bribe case  sakal
पुणे

Bribe Case : लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास अटक

सकाळ वृत्तसेवा

चालकाने परस्पर कर्नाटकात नेलेली मोटार परत मिळवून देण्यासाठी मोटारमालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने अटक केली आहे.

पुणे - चालकाने परस्पर कर्नाटकात नेलेली मोटार परत मिळवून देण्यासाठी मोटारमालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने अटक केली आहे. न्यायालयाने संबंधित उपनिरीक्षकास सोमवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शशिकांत नारायण पवार असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या ते सिंहगड पोलिस ठाण्यातील अभिरुची पोलिस चौकीत नियुक्तीस आहेत. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीची मोटार त्यांचा बदली चालक परस्पर घेऊन कर्नाटकात गेला होता. ही मोटार परत मिळवून देण्यासाठी मोटारमालकाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याची चौकशी शशिकांत पवार करीत होते.

मोटार परत मिळवून देण्यासाठी मोबदला म्हणून पवार यांनी मोटारमालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर मोटारमालकाने तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर मोटारमालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाचेची मागणी केल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार करीत आहेत.

तीन दिवसांपूर्वीच हवालदाराविरुध्द गुन्हा

शेतकऱ्याचा ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिस हवालदार रामदास जाधव याने शेतकऱ्याकडे २० हजारांची लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात पोलिस हवालदाराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नुकताच तीन एप्रिल रोजी घडला होता. त्यानंतर तीन दिवसांतच पोलिस दलातील उपनिरीक्षकाने लाचेची मागणी केल्याचा प्रकार घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver: चांदी ठरली वरचढ! सोन्याला टाकले मागे; का ठरत आहे सर्वांच्या आवडीची?

Latest Marathi News Live Update : 'चिठ्ठी निघेल ते खात स्वीकारायचं आणि त्यात चांगल काम करायचं - मुरलीधर मोहोळ

Pakistan Fan : 'ट्रॅक्टर विकून मॅच पाहायला आलो पण लाज वाटली...' Ind vs Pak सामन्यानंतर चाहत्याचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी; किंग खान आणि खिलाडी अक्षयच्या 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष

NEET Success Story : आई-वडिलांनी केली मोलमजुरी, लेकीने फेडले पांग ; बनणार गावातली पहिली डॉक्टर

SCROLL FOR NEXT