

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वसामान्यांसाठी सोने-चांदी अधिक महाग होत असले तरी गुंतवणुकदारांसाठी ते मोठ्या फायद्याचे ठरले आहे. पूर्वीपासूनच लोक गुंतवणुकीसाठी सोने-चांदीला पसंती देतात. पण, यात आणखी वाढ होत असल्याचं चित्र आहे.
सर्वसाधारणपणे लोक सोन्याच्या वाढत्या किंमतीवर लक्ष ठेवतात, पण नुकतेच चांदीने परतावा देण्यामध्ये सोन्याला देखील मागे टाकले आहे. सध्या चांदीची किमत ९१ ते ९५ हजार रुपये प्रति किलो आहे. मे महिन्यामध्ये चांदीने सोनेच नाही तर बीएसई वरील परताव्याला देखील मागे टाकले आहे.
६ महिन्यामध्ये चांदीच्या किंमतीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये कॉमेक्सवर चांदीचा भाव ३० टक्क्यांनी वाढला आहे. एमसीएक्सवर चांदी विक्रमी ९५९५० रुपयांवर पोहोचली आहे. जगभरात ईव्ही आणि हायब्रिड कारची वाढती मागणी आणि सोलर एनर्जीमधील वाढती गुंतवणूक यामुळे देखील चांदीच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकार सोलार एनर्जीवर जास्त लक्ष देत आहे. त्यामुळेच चांदीची मागणी वाढली आहे. उद्योग कंपन्यांमध्ये चांदीची मागणी १० टक्क्यांनी वाढली आहे.
मोदी सरकारने तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे फेड रिझर्व्ह येत्या काही दिवसात चांगले निर्णय घेऊ शकते. त्यामुळे चांदी एक्सचेंच ट्रेडेड फंड गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.
संपूर्ण जगात ४० टक्के चांदी ही बिगर-औद्योगिक कामासाठी वापरली जाते. यंदा औद्योगिक क्षेत्रामध्ये चांदीची मागणी वाढत जाणार आहे. फेडरेल रिझर्व्हने व्याज दरात घट केली तर चांदीमधील गुंतवणूक वाढू शकते. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक येत्या ऑक्टोबर तिमाहीत व्याज दरामध्ये घट करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.