Pune Porsche Accident |Aneesh Awadhiya Esakal
पुणे

Pune Porsche Accident : अग्रवाल पती-पत्नीसह ससूनमधील डॉक्टरांच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Porsche Accident : पोलिस कोठीडची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी (ता.५) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सनिल गाडेकर

पुणे, ता. ५ : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात अग्रवाल पती-पत्नी यांच्या पोलीस कोठडीत 10 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर ससूनमधील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या पोलिस कोठीडत सात जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला.

मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि आई शिवानी विशाल अग्रवाल (दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

पोलिस कोठीडची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी (ता.५) न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्व आरोपींना मिळून कशाप्रकारे या गुन्ह्याच्या कट रचला याचा तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलीस कोठीडत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT