Pune Porsche Accident Not the signature of both judges Police object to Juvenile Justice Board verdict in Kalyaninagar accident case Esakal
पुणे

Pune Porsche Accident: दोघा न्यायाधीशांची सहीच नाही? कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाल न्याय मंडळाच्या निकालावर पोलिसांचा आक्षेप

Pune Porsche Accident: या घटनेनंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला पहिल्या दिवशी अटक केलं होतं आणि त्यानंतर ज्युवीनाईल कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली होती.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघात प्रकरणी अनेक अपडेट समोर येत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला पहिल्या दिवशी अटक केलं होतं आणि त्यानंतर ज्युवीनाईल कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली होती. ज्यामध्ये अल्पवयीन आरोपीला 300 शब्दाचा निबंध लिहायला सांगितला होता. मात्र, या ज्युवीनाईल कोर्टाच्या निकालामध्ये एक ट्विस्ट समोर येत आहे.

ज्युवीनाईल कोर्टाने दिलेल्या या निकालावर थेट पोलिसांनीच आक्षेप घेतला आहे. या कोर्टाच्या निकालामध्ये जी नोटीस जारी करण्यात आली आहे. त्या नोटीसवरती तीन न्यायाधिशांच्या स्वाक्षऱ्या अपेक्षित होत्या. मात्र, ज्युवीनाईल कोर्टाने रविवारी जो निकाल दिला त्यावर एकाच न्यायाधिशांची स्वाक्षरी दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या निकालावर आक्षेप घेत तो अवैध ठरवून पुन्हा एकदा ही केस रीओपन केलेली आहे.

बाल न्यायालयामध्ये जी सुनावणी होते तेव्हा निकालावर तीन न्यायाधिशांच्या सह्या अनिवार्य होत्या. परंतु कल्याणीनगर येथील अपघातामध्ये जी सुनावणी करण्यात आली, या सुनावणीच्या नोटिसवरती फक्त एकाच न्यायाधिशांची स्वाक्षरी ही दिसून येत आहे. त्याच्यामुळे हा निकाल ग्राह्य धरला जाऊ नये आणि हा निकाल अवैध ठरवावा अशी याचिका पुणे पोलिसांनी केली होती. ती मान्य करून हा निर्णय अवैध ठरवण्यात आलेला आहे आणि पुन्हा नव्याने या केस वर सुनावणी होत आहे.

ज्यामध्ये पोलिसांनी 185 कलम लावलेला आहे. आता दोन्ही पक्षातील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. साडेचार वाजेपर्यंत बाल न्यायालयाने ही सुनावणी राखून ठेवलेली आहे. यापूर्वी देखील अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पोलिसांनी नव्यानं 185 कलम दाखल करत आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT