Pune Porsche Crash  Sakal
पुणे

Pune Porsche Crash : निबंधाच्या शिक्षेवरून सोशल मीडियावर नाराजी

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

‘नई हवाओ की शोहबत बिघाड देती हैं,

कबूतरों को खुली छत बिघाड देती हैं,

जो जुर्म करते हैं, इतने बुरे नहीं होते,

सजा न देके अदालत बिघाड देती हैं.’

दिवंगत कवी राहत इंदोरी यांची ही शायरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर सोशल मीडियावर निकालाविरोधात नाराजी व्यक्त येत आहे. कविता आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून नागरिक व्यक्त होत असून ‘पुणे ॲक्सिडेंट’ हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.

‘लायसन्स प्लीज... निबंध आहे’, ‘रस्त्यापासून दूर चाला, तुमच्यामुळे एखाद्याचा बहुमूल्य वेळ निबंध लिहिण्यात वाया जाऊ शकतो’ अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. एक प्रकारे न्यायव्यवस्थेच्या निकालावरच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गाडीची पीयूसी नसलेल्या सर्वसामान्य नागरिकाला दिवसभर पोलिस ठाण्यात ठेवले जाते. मात्र, महागड्या गाड्या वापरणाऱ्या श्रीमंताच्या मुलाने दोघांना ठार केले, त्याला काही तासांत सुटका मिळते, असे म्हणत नेटकऱ्यांनी आपली नाराजी उघड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT