पुणे

बाणेरमधील रुग्णालयावर कारवाई नाहीच

CD

पुणे, ता. १४ : महापालिकेने बाणेरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीतील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या लुटीचा प्रकार सभागृहामध्ये उपस्थित झाला होता. त्यानंतरही प्रशासनाकडून संबंधित रुग्णालयावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाने केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत.

बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ मध्ये महापालिकेने ४० कोटी रुपये खर्च करून २५ हजार चौरस फुटांची इमारत उभारली आहे. कोरोना काळात या इमारतीमध्ये तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात आले. त्यासाठी कोट्यवधीची यंत्रसामग्रीही खरेदी करण्यात आली. त्यानंतर भवन विभाग व आरोग्य विभागाकडून संबंधित इमारत जेटी फाऊंडेशन या संस्थेला ‘आयआयएमएस हॉस्पिटल’ या रुग्णालयासाठी देण्यात आली.
नियमानुसार महापालिकेच्या मालमत्ता विनाभाड्याने देता येत नाहीत. असे असतानाही, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद नसलेल्या संबंधित संस्थेला कोट्यवधीची इमारत अवघ्या ५०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर देण्यात आली, असा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी २० एप्रिलला सर्वसाधारण सभेत केला होता. या रुग्णालयाकडून महापालिकेच्या सेवा घेतल्या जातात, मात्र रुग्णांना अत्यल्प दरात सेवा दिल्या जात नाहीत. राज्य सरकारच्या योजनाही रुग्णालय लागू करत नसल्याचा आरोपही बालवडकर यांनी केला होता. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रुग्णालयास नोटीस बजावून सखोल चौकशी केली जाईल. त्याबाबतचा अहवाल सादर करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र अवघ्या आठ दिवसांपूर्वी संबंधित रुग्णालयास नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

महापौर, आयुक्तांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
रुग्णालय व महापालिका यांच्यात नेमका काय करार झाला होता, त्यांचे खरोखरच उल्लंघन केले आहे का? गरीब रुग्णांना सेवा नाकारली जात आहे का? सरकारी योजनांचे लाभ दिले जात आहेत का? या संदर्भातील चौकशी केली जाणार आहे, त्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल तयार करून तो सभागृहासमोर मांडला जाणार आहे. महापौर मंजूषा नागपुरे व महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनीही या प्रश्नावर कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानंतरही आरोग्य विभागाकडून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बाणेर येथील महापालिकेच्या इमारतीत सुरू असलेल्या रुग्णालयास नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जाईल, त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- डॉ. नीना बोराडे, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT