पुणे

बाणेरमधील रुग्णालयाचे गौडबंगाल

CD

पुणे, ता. २२ ः महापालिकेने बाणेरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खासगी रुग्णालयाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देऊनही आरोग्य विभागाने कोणतीही हालचाली केलेली नाही. महापालिकेच्या मुख्य सभेत याबाबत प्रश्‍न उपस्थित करून दोन महिने उलटले, त्यानंतरही आरोग्य विभागाकडून चौकशी करून कारवाई झालेली नाही. त्यामुळे महापालिकेची मुख्य सभा व महापौर मंजूषा नागपुरे यांच्या आदेशाला तसेच महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या सूचनेलाही आरोग्य विभाग जुमानत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.
बाणेर येथे महापालिकेने ४४ कोटी रुपये खर्च करून २५ हजार चौरस फुटाची इमारत उभारली आहे. कोरोना कालावधीत संबंधित इमारतीमध्ये तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात आले. त्यासाठी कोट्यवधींची यंत्रसामग्रीही घेण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या भवन विभाग व आरोग्य विभागाकडून संबंधित इमारत जेटी फाउंडेशनच्या रुग्णालयासाठी देण्यात आली. नियमाप्रमाणे महापालिकेच्या मालमत्ता विनाभाड्याने देता येत नाहीत. असे असतानाही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद नसलेल्या संबंधित संस्थेला कोट्यवधींची इमारत अवघ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर देण्यात आल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी २० एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत केला होता. त्यावर महापौर मंजूषा नागपुरे यांनी याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
मेमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णालयास केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार करण्यात आले. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात १७ जूनच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यानंतरही आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आरोग्य विभाग उत्तर देणार का?
- रुग्णालय व महापालिका यांच्यात नेमका काय करार झाला होता?
- नियमांचे उल्लंघन कशा पद्धतीने करण्यात आले?
- गरीब रुग्णांना सेवा का नाकारली जात आहे?
- रुग्णांकडून जादा बिल का आकारले जात आहे?
- सरकारी योजनांचे लाभ दिले का जात नाहीत?

अधिकाऱ्यांचे साटेलोटे
संबंधित रुग्णालयाच्या गैरप्रकारात महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी संगनमत करून महापालिकेच्या इमारतीमध्ये अत्यल्प खर्चात खासगी रुग्णालय सुरू करण्याचा घाट घातला. संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यासाठी समिती नेमली; मात्र या समितीमध्येदेखील त्याच अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी, अहवाल व कारवाई होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

Crime News: कोर्याची सीमा! मामानं ९ महिन्यांच्या भाचीला घरातून उचलून नेलं, नंतर घडवलं घृणास्पद कृत्य; शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

Latest Marathi News Live Update : कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट

बाप-लेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी! 'फादर्स डे'ला रिलीज झाला 'द्विधा' चित्रपटाचा टिझर; 'या' दिवशी येणार भेटीला!

SCROLL FOR NEXT