पुणे, ता. १० ः विमाननगर भागातील एका माॅलमध्ये पहाटे साडेतीनपर्यंत सुरू असलेल्या पबवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत मद्यसाठा, ध्वनिवर्धक यंत्रणा असा दोन लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पबचा मालक, व्यवस्थापक, ध्वनिवर्धक यंत्रणा चालक, कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, तसेच ‘प्रोहिबेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स ॲक्ट’ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील एका माॅलमध्ये असलेला पब पहाटे साडेतीनपर्यंत सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. कारवाईच्या वेळी पबमध्ये ८९ ग्राहक उपस्थित होते. त्यामध्ये ६३ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश होता. त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.
पोलिसांनी पबमधील मद्यसाठ्याची तपासणी केली. एक लाख ६७ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा तेथे आढळून आला. पबमधील ७५ हजार रुपयांची ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण दोन लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पबचालक, तसेच व्यवस्थापकांना दिलेली परवानगी, तसेच अटींचे पालन झाले आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.