Pune  sakal media
पुणे

Pune : पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका कार्यकक्षेतील मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या एकूण १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १४ पैकी १० शिक्षक पुणे मनपा शाळेतील तर ४ शिक्षक खाजगी प्राथमिक शाळेतील आहेत. सोबत आदर्श शिक्षक पुरस्कार यादी जोडण्यात आली आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण ५९ प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे आले होते. सदर प्रस्तावातून गुणवंत शिक्षक निवडण्यासाठी शिक्षण देतील तज्ञ व्यक्तीची समिती नेमण्यात आली होती. शासन निकषा प्रमाणे आलेल्या प्रस्तावामभून आदर्श शिक्षक निवडण्यात आले.आदर्श शिक्षक पुरस्कार्थी शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देवूनगौरविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (प्राथमिक) डॉ. मीनाक्षी राऊत आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी दिली आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2022-23

पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी. मनपा प्राथमिक शाळा - अंकुश शिवाजी माने (कात्रज), ज्ञानेश वसंतराव हंबीर (खराडी), नवनाथ बाळासाहेब भोसले (खराडी), रजनी गोविंद गोडसे(वडगाव शेरी), हेमलता भिमराव चव्हाण (कात्रज), विजय दिगंबर माने (हडपसर), राणी जयंत कुलकर्णी (कात्रज) चित्रा नितीन पेंढारकर (वारजे), स्मिता अशोक धारूरकर (हिंगणे खुर्द), वर्षा अनंतकुमार पंचभाई ( ढोले पाटील रोड)

खासगी शाळा शिक्षकाचे नाव

पुष्पा महेंद्र देशमाने (नवीन मराठी शाळा)रोहिणी गणेश हेमाडे (कै. चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक विद्यालय, वडगाव बु॥)डॉ. प्रीती दिवाकर मानेकर (हिंद इंग्लिश मिडीयम स्कूल, विमाननगर), शुभदा दीपक शिरोडे (म.ए.सो. भावे प्राथमिक शाळा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT