pune rains esakal
पुणे

Pune Flood: राज ठाकरेंची मागणी एकनाथ शिंदेंनी काही तासांतच पूर्ण केली; 'त्या' दोन तरुणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत

Pune Alert: मागच्या आठवड्यामध्ये पुणे मुळा नदीला मोठा पूर आला होता. त्या पुरामध्ये दोन तरुण विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडले होते. डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडी येथे राहणाऱ्या अभिषेक घाणेकर आणि आकाश माने या तरुणांचा यात मृत्यू झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

CM Eknath Shinde: मुसळधार पावसामुळे पुण्यात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही तासात पूर्ण केली आहे. पुणे येथील पुरामध्ये जीव गमवावा लागलेल्या दोन तरुणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही तासात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

मागच्या आठवड्यामध्ये पुणे मुळा नदीला मोठा पूर आला होता. त्या पुरामध्ये दोन तरुण विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडले होते. डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडी येथे राहणाऱ्या अभिषेक घाणेकर आणि आकाश माने या तरुणांचा यात मृत्यू झाला होता.

या प्रकरणात शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पुण्यात आलेल्या पुराबाबतही चर्चा झाली. यावेळी पुण्यातील याच पुरात या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याना यापूर्वीच पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य आपत्ती निवारण निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र या दोन्ही तरुणांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ही मदत त्यांना पुरेशी नसल्याचे राज यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ या दोन तरुणांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदतीचे धनादेश वर्षा बंगल्यावर मागवून घेतले. हे धनादेश शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनसे शिष्टमंडळातील आबा येडगे आणि रणजित शितोळे यांना प्रतिनिधिक स्वरूपात सुपूर्द करण्यात आले. ही मदत हे दोघे या दोन तरुणांच्या कुटूंबियांपर्यंत पोहचवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT