Pune Rain: जुनी सांगवीकरांना पुन्हा जलकोंडीची धास्ती - नदी किनारा रहिवाशांना निवारा केंद्रात हलवले  
पुणे

Pune Rain: जुनी सांगवीकरांना पुन्हा जलकोंडीची धास्ती; नदीकडेच्या रहिवाशांना निवारा केंद्रात हलवले

रमेश मोरे

Old Sangavi: जुनी सांगवीला दोन्ही बाजुंनी पवना व मुळा नद्या असल्याने सध्या जुनी सांगवी करांना पुरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे . पावसाळ्यात सांगवीतील नागरिकांना पुराची धास्ती असते. गत आठवड्यात आलेल्या पुरामुळे नागरिकांना २००५, २०१९ मधील झालेल्या पुराच्या पाण्याच्या झळांची त्रासाची अनुभूती पुन्हा घ्यावी लागली.

यामुळे येथील मधुबन, मुळा नगर झोपडपट्टी, प्रियदर्शनी नगर संगमनगर, मुळा नदी किनारा परिसर प्रभावा खाली येऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. सध्या मुळशी व पावना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पाहता मधुबन, मुळा नगर झोपडपट्टी रहिवाशांना येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. धरण परिसर व संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे दापोडी जुनी सांगवीकरांची काळजी वाढले आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे सांगवी परिसरातील नद्यांची पाणी पातळी वाढले आहे.

महापालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा रात्र काढली जागून

शनिवार ता.३ रात्री महापालिकेच्या वतीने आपत्कालीन विभाग, अग्निशामकदल, यांनी नदी किनारा भागात संवेदनशील ठिकाणी सूचना सतर्कतेसाठी गस्त घालण्यात आली. महापालिकेकडून नागरिकांना सज्ज राहण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होत्या. पुराच्या धास्तीने जुनी सांगवी नदी किनारा रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली.अनेकांनी पै पाहुण्यांकडे आश्रय घेतला तर मुळा नगर रहिवाशांना निवारा केंद्रात हलविण्यात आले.

रविवारी सकाळी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पालिका ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जुनी सांगवी परिसरात परिस्थितीचा आढावा घेत भेट दिली. २०१९ ला येथील मधुबन सोसायटी, मुळा नगर झोपडपट्टी पवनानगर घाट जमचाळ प्रियदर्शनी नगर, शितोळे नगर, शिवांजली कॉर्नर,ममता नगर, संगमनगर,दत्त आश्रम, नवी सांगवी येथील इंद्रप्रस्थ सोसायटी हा भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला होता.

हा भाग होतो प्रभावित- पवना नदी किनारा भागातील स्मशानभूमी, वेताळ महाराज उद्यान, दशक्रिया विधी घाट इत्यादी पाणी खाली जातो. तर साई चौक ते माहेश्वरी चौक, पवना नदी किनारा सांगवी दापोडी रस्ता या भागाला पुराचा फटका बसतो.

महापालिकेच्या वतीने नदी किनारा रहिवासी नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भोजनाची व निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे. माननीय आयुक्त साहेब स्वतः परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणा सजग आहेत. नागरिकांनी धोका न पत्करता पालिकेने केलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे. उमेश ढाकणे ह क्षेत्रिय अधिकारी ह प्रभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT