Pune Rain 
पुणे

Pune Rain: पुण्यात मॉन्सूनला जोरदार सुरुवात; विजांच्या कडकडाटांसह पावसाची बॅटिंग, पुढील ३ तास सावधानतेचा इशारा

शहर आणि परिसरात सध्या आभाळ भरुन आलं असून पुण्याच्या उत्तर-पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Pune Rain : पुणे शहर आणि जिल्ह्यात मॉन्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. शहर आणि परिसरात सध्या आभाळ भरुन आलं असून पुण्याच्या उत्तर-पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. सर्वत्र अंधारुन आलं असून गेल्या तापसभरापासून पाऊस चांगलाच बरसतो आहे, त्यामुळं दिवसभर काहीसा उकाडा जाणवत होता पण आता पावसानं हजेरी लावल्यानं हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. (Pune Rain strong start of monsoon heavy rainfall in district with thunderbolts)

सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

पुणे शहरातील पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तसेच वारजे माळवाडी, कोथरुड या भागांसह घोरपडी, लोहगाव इथं पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याचबरोबर सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं धायरी फाट्यापासून पुण्याच्या दिशेला मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात ६ जून रोजी मॉन्सूननं हजेरी लावली असून दोन दिवसांत अधुनमधून साधारण पाऊस कोसळत होता. पण आज पावसानं पुणे शहरांसह परिसरात चांगली हजेरी लावली. तसंच पुढील आठवड्याभरात पुण्यात पाऊस कसा असेल? याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मुंबई बंगळूर महामार्गावर स्वामी नारायण मंदिरापासून मुंबईच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी तसेच नवले पूल परिसरात जोरदार पाऊस

आठवडाभर पुण्यात कसा असेल पाऊस

हवामान खात्याच्या माहितीनुसार, ९ ते १४ जून या काळात ढगाळ वातावरण राहणार असून साधारण पाऊस असणार आहे. यांपैकी उद्या ९ जूनला ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यांतर १२ ते १४ या तीन दिवसांच्या काळात दिवसातून दोन ते तीन वेळेस पाऊस बरसू शकतो असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT