Pune Rain Sakal
पुणे

Pune Rain: ...अन् चेंबरमधला कचरा हाताने काढत पोलिसांनी साचलेल्या पाण्याला वाट करून दिली!

काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबलं होतं. त्यामुळे पुणेकरांची मोठी पंचाईत झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सव संपताच काल आलेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच फजिती केली. हा पाऊस इतका भयंकर होता की त्यामुळे अक्षरशः पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं, सगळ्या व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला होता.

पुण्यातल्या सिंहगड, खडकवासला यासह शहर परिसरात सायंकाळी साडेचारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे चंदननगर, कोथरुड, वनाज कचरा डेपो, पाषाण, वानवडी, कात्रज उद्यान या भागांसह अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यामध्ये काही ठिकाणी गाड्या अडकून पडल्या असून दुचाकी वाहून गेल्या आहेत. जवळपास पाच तास पडलेल्या या पावसाचं पाणी काही घरांमध्येही शिरल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, विमाननगर चौकात वाहतूक पोलिसांनी या साचलेल्या पाण्याला वाट करून द्यायचा प्रयत्न केला आहे. या चौकात वाहतूक पोलिसांनी स्वतः हाताने चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढला आणि या साचलेल्या पाण्याला वाट करून द्यायचा प्रयत्न केला आहे. 'सकाळ'च्या प्रतिनिधीने याविषयीची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर काही जणांनी या पोलिसांचं कौतुक केलं असून काही जणांनी महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT