Pune_Rain
Pune_Rain 
पुणे

पुण्यात आठवडाभर पावसाचा इशारा

नामदेव कुंभार

पुणे शहरात शुक्रवारच्या (ता. १८) तुलनेत शनिवार कमी पाऊस पडला. सकाळी काही प्रमाणात पाऊस उघडला होता. परंतु ढगाळ वातावरण कायम होते. मात्र, दुपारनंतर शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम सरी पडल्या. शनिवारी शहरात ७.२ मिलिमिटर तर लोहगाव येथे १४.६ मिलिमिटर इतक्या पावसाची नोंद झाली.

शहर आणि परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता. मात्र शनिवारी (ता. १९) तुलनेने कमी पाऊस होता. येत्या आठवडाभर शहर आणि परिसरात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात शनिवारी सकाळपर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. तर दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT