Pune Rain Update:  esakal
पुणे

Pune Rain Update: पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा! ढगांच्या गडगडाटासह उपनगरात पावसाला सुरुवात

Pune Rain Update: काल (सोमवार) देखील खडकवासला, वारजे परिसरात हलक्या स्वरुपात पाऊस झाला होता. दरम्यान आज पिंपरी आणि पुण्यात पावसाने हजेरी लावली.

Sandip Kapde

Pune Rain Update:

पुणे शहरात पावसाच्या सरी पडत असून ढगांच्या गडगडाटासह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे.  गेल्या दोन दिवसापासून उकाडा जाणवत होता.  दरम्यान पावसाच्या सरी आल्याने पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.  बाणेर-बालेवाडी येथे देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.  यासबोतच सिंहगड रस्ता घोरपडी परिसरात देखील रिमझिम पाऊस सुरू आहे.  

काल सोमवार देखील खडकवासला, वारजे परिसरात हलक्या स्वरुपात पाऊस झाला होता.

शेतरऱ्यांच्या अडचणीत वाढ-

यंदाच्या हंगामात झालेला अवकाळी पाऊस, पिकास झालेली थ्रीप्स रोगाची लागण व हमीभावाअभावी तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी का होईना उष्णतेपासून दिलासा मिळाला. तापलेल्या उन्हाने उष्णतेचे सर्व विक्रम मागे टाकत सर्वाधिक तापमानाची नोंद केली असताना सोमवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात ढग दाटून येऊन अचानक बदल झाले.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ-

यंदाच्या हंगामात झालेला अवकाळी पाऊस, पिकास झालेली थ्रीप्स रोगाची लागण व हमीभावाअभावी तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी का होईना उष्णतेपासून दिलासा मिळाला. तापलेल्या उन्हाने उष्णतेचे सर्व विक्रम मागे टाकत सर्वाधिक तापमानाची नोंद केली असताना सोमवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात ढग दाटून येऊन अचानक बदल झाले.

मुठा खोऱ्यात गारांसह पाऊस -

मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यात काल (सोमवारी) एक तास गारांसह जोरदार अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सांयकाळी पाच वाजता गारांसह जोरदार पाऊस सुरू झाला. खारवडे येथे रस्त्याच्या कडेने पाणी वाहू लागले होते. शेतकऱ्यांची सध्या खाचरांची ओढणी, शेणखते टाकणे, बांध दुरुस्तीची कामे शिवारात सुरू होती.

अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. तसेच आंबा फळबागेवर गारांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT