पुणे

Pune Rains : वाढविली वर्दीची शान!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.  

भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले. 

भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते. 

...आणि वाहने वाहून गेली  
वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले.

जीव आणि सोनेही वाचविले 
वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले.

पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले.
- अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT