book sakal
पुणे

Pune : ‘राजमाता जिजाऊ’ पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन

चरित्र अन् कार्याची अभूतपूर्व मांडणी; ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राजमाता जिजाऊ यांचे वैचारिक, सामाजिक आणि राजकीय कर्तृत्व यांविषयी संशोधनात्मक मांडणी करणारे ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ हे पुस्तक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी लिहिले आहे.

‘सकाळ प्रकाशन’च्या वतीने या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन येत्या गुरुवारी (ता. २) ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल.

आजपर्यंत केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराजांची माता’ म्हणून केल्या गेलेल्या ‘जिजाऊं’च्या व्यक्तिमत्त्वाच्या विचारापलीकडची त्यांच्या चरित्र आणि कार्याची सखोल मांडणी या पुस्तकात आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याला आकार देणारी एक सामर्थ्यशाली स्त्री म्हणून जिजाऊंची स्वतंत्र ओळख करून देणारे हे चरित्रलेखन आहे.

अनेक ऐतिहासिक साधनांचा, संदर्भांचा, घटनांचा तर्कसंगत विचार करत ही मांडणी डॉ. पवार यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक सोहळा घडवणे, हे जिजाऊंचे कार्य त्यांना ‘राजमाता’ याबरोबरच ‘स्वराज्यक्रांतीच्या प्रणेता’ बनवणारे आहे. जिजाऊंनी अंधश्रद्धांना विवेकबुद्धीने नाकारून नवीन सामाजिक, राजकीय, धार्मिक पुनर्रचना घडवून आणली. त्यामुळे जिजाऊंकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन या चरित्रलेखनाने मिळवून दिला आहे.

या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी कार्यक्रमापूर्वी श्रोत्यांनी अर्धा तास आधी सायंकाळी पाच वाजता स्थानापन्न व्हावे, अशी विनंती ‘सकाळ’ प्रकाशनातर्फे करण्यात आली आहे.

पुस्तकाविषयी....

‘जिजाऊं’च्या चरित्र आणि कार्याची अभूतपूर्व मांडणी

सतराव्या शतकातील राजकीय प्रक्रियांकडे, सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी

मराठा साम्राज्याला आकार देणारी मूल्यव्यवस्था उभी करण्यासाठी जिजाऊंचे योगदान

प्रयोगशील जीवन आणि अर्थकारणाचा पाया रचत स्वराज्याच्या उभारणीसाठी दाखविलेला राजमार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT