पुणे

Pune: बोरी बुद्रूक गावातील नागरिकांना बिबट्याचे दररोज होतेय दर्शन

- राजेश शेळके

Pune: बोरी बुद्रूक (ता.जुन्नर) हे गाव कुकडी नदीच्या तिरावर वसलेले असल्याने या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी बिबट्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा मिळत असल्याने बिबट्यांचा वावर जास्त दिसुन येत आहे.

सध्या या परिसरातील ऊस तोडणी अंतिम टप्प्यांवर आलेली असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तसेच त्यांना त्यांचे खाद्य मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांवर तसेच माणसांवर देखील हल्ले करू लागला आहे.

दरम्यान या गावातील साईनगर मळ्यात दुचाकीस्वारांच्या मागे लागत असल्याने येथील नागरिक अतिशय भितीने या ठिकाणाहून ते जा करत आहेत .दोन दिवसांपुर्वी येथील ऋषिकेश जाधव हे दुकान बंद करून घरी येत असताना रोडवरच असलेल्या उसाच्या शेतातुन अचानक पणे आलेल्या बिबटयाने त्यांचा पाठलाग केला परंतु जाधव यांनी गाडीचा वेग वाढवला असता ते जोरात गाडीवरून खाली पडल्यानंतर त्यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला.

तसेच कालच संजय जाधव व कैलास जाधव या दोन मोटार सायकल वाल्यांच्या मागे बिबट्या लागला होता परंतु ते ही थोडक्यात वाचले आहे.या परिसरात बिबट्याची दहशत वाढतच चालली असुन वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT