Pune Weekend Lockdown Sakal
पुणे

वीकेंड लॉकडाउनला पुणेकरांनी दिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी लागू केलेल्या वीकेंड लॉकडाउनला शनिवारी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी लागू केलेल्या वीकेंड लॉकडाउनला शनिवारी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दूध खरेदी, अत्यावश्‍यक सेवेच्या ठिकाणी जाणारे कर्मचारी यांसह इतर आवश्‍यक बाबींसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची सकाळी काही ठिकाणी तुरळक गर्दी झाली होती. मात्र, शनिवारी दुपारी शहरासह उपनगरांत शुकशुकाट पसरला होता.

नागरिकांनी वीकेंड लॉकडाउन आणि कोरोनाविषयक खबरदारी नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी शहरातील महत्त्वाच्या चौकांसह तब्बल ९६ ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. मात्र, फार कमी चेक नाक्यांवर नागरिकांची तपासणी केली जात असल्याचे पाहायला मिळाले. मेडिकल व अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व दुकाने शनिवार आणि रविवारी बंद ठेवली आहेत. त्यामुळे घरगुती वापरासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंची अनेकांनी शुक्रवारीच खरेदी केली होती.

याबाबत मेडिकल व्यावसायिक संतोष माने-देशमुख म्हणाले, ‘‘आठवड्याचा विचार करता शनिवारी सदाशिव पेठेतील होलसेल मेडिकल मार्केटमध्ये जास्त गर्दी आहे. मात्र, परिसरात इतरत्र शुकशुकाट आहे. या ठिकाणी औषधे खरेदी करण्यासाठी येणारे ८० टक्के रिटेलर आहेत, तर उर्वरित डॉक्टर, हॉस्पिटल चालक असतात. कोरोनाविषयक औषधे आणि वस्तूंचीच मागणी सध्या जास्त आहे.’’

शहरात ९६ ठिकाणी चेकपोस्ट सुरू केले आहेत. सवलती व्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वीकेंड लॉकडाउनमध्ये सवलत नसलेल्या आस्थापना आज बंद आहेत. मात्र, गेल्या दोन लॉकडाउनचा विचार करता, शनिवारी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त दिसून आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करणे, त्यांच्यावर खटला दाखल करणे किंवा दंड करणे, अशी कारवाई केली जात आहे.

- डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT