नाट्यगृह
नाट्यगृह  sakal
पुणे

Pune : नाट्यगृह, चित्रपट गृह, महोत्सवांवर बंधने कायम; आयुक्तांचे आदेश

ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता एक डिसेंबरपासून १०० टक्के सुरू होतील, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी २५ टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश आज (सोमवारी) काढले आहेत.

पालकमंत्री पवार यांनी शनिवारच्या (ता. २७) बैठकीमध्ये मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये ५० टक्केच परवानगी असल्याने महापालिका काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कोरोनाचे निर्बंध, शर्ती वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी ४८ तास आधी पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे.

या ठिकाणी असणार ५० टक्के उपस्थितीचे बंधन

चित्रपट गृह, नाट्य गृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसाठी परवानगी देता येईल. त्यामुळे २ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे.

खुल्या जागेसाठी २५ टक्के उपस्थिती

संपूर्ण खुल्या जागेत (ओपन टू स्काय) कोणताही समारंभ, संमेलनाला तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांच्या उपस्थितीतच परवानगी दिली जाईल. अशा ठिकाणच्या क्षमतेची आधीच निश्‍चीती केली नसेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास क्षमता ठरविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी १ हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहाणार असतील तर त्याची प्राधिकरणास माहिती द्यावी लागेल. तेथे प्राधिरणातर्फे परिक्षक म्हणून प्रतिनधी पाठवला जाईल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कार्यक्रम पूर्ण किंवा अशतः रद्द केला जाऊ शकतो असे आदेशात नमूद केले आहे. यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शताब्दी वर्ष असल्याने सवाई गंधर्व महोत्सवाला विशेष महत्व होते. पण आता हा कार्यक्रम २५ टक्के उपस्थितीमध्ये घ्यावा लागणार आहे.

शाळेबाबत निर्णय नाही

१ डिसेंबर पासून इयत्ता पहिली पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पण महापालिकेला शाळा सुरू करण्याबाबत लेखी आदेश प्राप्त झालेले नसल्याने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही असे प्रशासना स्पष्ट केले आहे.

यासाठी लागणार संपूर्ण लसीकरण

  • ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस होऊन गेले आहेत त्याचा यात समावेश होईल

  • तिकीट असलेले किंवा नसलेल्या कार्यक्रमाला येणारे पाहुणे, अभ्यागत किंवा इतर व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण होणे बंधनकराक

  • दुकाने, आस्थापना मॉल समारंभ, संमेलन मेळावे यासाठी अभ्यागत, ग्राहक यांना अट लागू

  • सर्व परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश मिळेल

  • संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी शासनाचा युनिव्हर्सल पास किंवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे

  • १८ वर्षाखालील नागरिकांनी शाळेते किंवा शासकीय ओळखपत्र सोबत ठेवावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT