Accident sakal
पुणे

पुणे : संरक्षक ग्रीलला धडकून मुलाचा जागीच मृत्यू

पुलाच्या संरक्षक लोखंडी ग्रीलला धडकून एका मुलाचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव येथील हिल व्हिव सोसायटी समोर दत्तनगर नऱ्हे रस्त्यावर असणाऱ्या पुलाच्या संरक्षक लोखंडी ग्रीलला धडकून एका मुलाचा जागीच मृत्यू झाला.

युग जिग्नेश वडसोला (वय १२ वर्ष रा.अमित अस्ट्रॉनिया सोसायटी ) असे या मुलाचे नाव आहे. युग हा दत्तनगर कडून आपल्या सायकलवर बुधवारी (ता. 3) आंबेगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, दत्तनगर आंबेगावकडे जाताना असणाऱ्या तीव्र उताराला सायकलचा वेग न आवरल्याने सायकलची रस्त्यावर असलेल्या संरक्षक लोखंडी ग्रीलला धडक बसली.

त्यामुळे झालेल्या अपघातात युग याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची दत्तनगर पोलिस चौकीत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT