Light
Light sakal
पुणे

अंधारातील दुर्गम वाड्या-वस्त्या होणार प्रकाशमय; वीजेसाठी १२ कोटी मंजूर

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, वेल्हे आणि हवेली या तीन तालुक्यांतील एकूण २४ दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून खास बाब म्हणून १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक व पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या सततच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यासाठी सुळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानले आहेत. मुळशी आणि वेल्हे तालुक्यांतील विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम गावांत विजेचे प्रश्न असून ते सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

त्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या बारा कोटी निधीमधून मुळशी तालुक्यातील वेगरे, कोंदूर, मोसे-दादवली, अडमाळ-पासलकर वस्ती, वांजळे-रामवाडी, जताडे-कुडलेवस्ती, पोमगाव-कातर वस्ती या सात ठिकाणी तसेच वेल्हे तालुक्यातील धिसर-ढेबेवस्ती, धानेप-धनगरवस्ती, घावर-घावरवाडीवस्ती, भागीनघर-वाडीवस्ती, भट्टी-वाघदरा-ढेबेवस्ती, सुरवड-वाडीवस्ती, माणगाव-कुंभतलवस्ती, रुळे-काळूबाईचा वाडा, शिरकोली-घरकूलवस्ती, कुरण-मोरेवस्ती, खामगाव-तळजाईवस्ती, वरोती-जननीमाता मंदिर, कोंढवली-स्मशानभूमी, केतकावणे-स्मशानभूमी, दादवडी-वस्ती, वरघड-बिरोबावाडी या सोळा ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.

या दोन तालुक्यांबरोबरच हवेली तालुक्यातील आगळंबे यथे असलेल्या ठाकरवाडी-धनगरवाडा या ठिकाणीही विजेची आवश्यकता आहे. येथेही लवकरच वीजपुरवठा करण्यात येईल असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. वरील सर्व २४ गावांलागतच्या वाड्या वस्त्या तसेच मंदिर आणि स्मशानभूमीला वीजपुरवठा करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याबाबत सुळे या अनेक वेळा पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटी घेऊन लक्षात आणून देत होत्या.

त्यासाठी निधीची मागणी करत होत्या. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीमधून खास बाब म्हणून बारा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून लवकरात लवकर या सर्व विशेष आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT