ट्रक उलटल्याने खंबाटकीत वाहतूक ठप्प
पुणे- सातारा लेनवरील स्थिती; घाटात दुसरा मालट्रक बंद पडल्याने कोंडी
खंडाळा, ता. २२ : पुणे- सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी आज पहाटे ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या, तोपर्यंत खंबाटकी घाटामध्ये ट्रक बंद पडल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक विस्कळित झाली.
याबाबतची माहिती अशी, की खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी सातारा बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर ट्रक उलटल्याने तो रस्त्यावरच आडवा झाला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. सकाळी सात वाजेपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यातच रविवार असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक होती. वाहनांच्या रांगा केसुर्डीपर्यंत तीन किलोमीटर लांब लागल्या होत्या. यावेळी महामार्ग पोलिस व खंडाळा वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साह्याने उलटलेला ट्रक बाजूला केला. तोपर्यंत सिंगल लेनवर वाहतूक सुरू होती.
दरम्यान, ११ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटाच्या मध्यावर मालट्रक बंद पडल्याने सिंगल लेन वाहतूक सुरू ठेवण्यात आली. मात्र, रस्त्यावर वाहनांची संख्या पाहता येथेही वाहनांच्या रांगा लागल्या. ४० मिनिटांत घाट पार होतो. मात्र, यासाठी एका तासापेक्षा अधिकचा वेळ लागत होता. काही वाहने बंद पडल्याने पोलिसांनी बाजूला केली.
भुईंज महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक श्याम गोरड व सहकाऱ्यांनी मालट्रक बाजूला करून दुपारी तीन वाजता वाहतूक सुरळीत झाली. साताराहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दिवसभर सुरळीत राहिली.
-------------------------------
06009, 06010
खंडाळा : घाटाच्या पायथ्याशी बंद पडलेला ट्रक बाजूला करण्याचे सुरू असलेले काम.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.