Election  sakal
पुणे

Pune : अधिसभेचे निरक्षर मतदान

मतदानाच्या प्रक्रियेपासून ते उभे राहिलेले उमेदवार नक्की कोण आहे

सम्राट कदम

पुणे : मतदान कसं करायचं कुणाला माहीत आहे का रे?... अंक लिहायचा का ‘टिकमार’ करायची?....पेन कुणाचा वापरायचा?... तासभर झालाय रांगेत उभीय, अजून नंबर नाही आला... या आणि अशा अनेक प्रश्नांनी रविवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा निवडणूक पार पडली.

बहुतेक पदवीधर मतदार पदवीधरांसाठीच मतदान करताना ‘निरक्षर’ असल्याचे पाहायला मिळाला. मतदानाच्या प्रक्रियेपासून ते उभे राहिलेले उमेदवार नक्की कोण आहे, या बद्दल अनेक मतदार अनभिज्ञ होते. मागील वर्षीपेक्षा यंदा मतदारांचा ओघ जरी वाढलेला असला, तरी मतदानासंबंधीच्या जागृतीचा स्पष्ट अभाव दिसत होता. सकाळी १० वाजता संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारनंतर वेग घेतल्याचे पाहायला मिळाले. विद्यापीठ प्रशासनाकडून मतदान केंद्रावरील सुविधांचा आणि प्रक्रियांचा बंदोबस्त पक्का करण्यात आला होता. तसेच विविध पॅलनच्या कार्यकर्त्यांच्या बुथममुळे मतदारांना यादीतील नाव शोधण्यापासून ते मतदानाच्या बूथची इत्थंभूत माहिती मिळाली.

Election

मतदान थांबविले...

दुपारी दोनच्या सुमारास गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात काही काळासाठी मतदान थांबविण्यात आले. विद्यार्थी विकास मंचाच्या बूथवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर मतदान काही काळ थांबविण्यात आले.

कुठे ताटकळत तर कुठे निवांत...

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात सकाळपासूनच मतदारांची गर्दी होती. सुमारे एक ते दीड तास मतदानासाठी प्रतिक्षा करावी लागल्याचे औंध येथून आलेल्या एका मतदाराने सांगितले. दुपारी चार वाजेच्या दरम्यान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी भेट देत मतदानासाठीच्या कक्षांची संख्या वाढविण्यास सांगितले. त्यानंतर मतदानाला थोडा वेग प्राप्त झाला.

संस्थांचा ‘अतिरेक’ ः

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील मतदानामध्ये शैक्षणिक संस्था आणि त्यांच्याशी निगडित ‘पॅनल’चा अतिरेक पाहायला मिळाले. मतदारांना मतपेटीपर्यंत जाण्यापासून आणि उमेदवार निवडण्यासाठी भाग पाडणारी ‘गैर’रचना अवलंबिण्यात आली होती. काही केंद्रांमध्ये तर निवडणूक घोषणापत्रापासून उमेदवारांच्या यादी पर्यंत सर्वच उपलब्ध करण्यात आल्याचे निरीक्षण प्रत्यक्ष नोंदविण्यात आले.

नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत पार पडले असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मतदारांचा टक्का वाढला आहे. गर्दी झालेल्या ठिकाणी मतदान बुथची संख्या वाढविण्यात आली आहे.

- डॉ. प्रफुल्ल पवार, मुख्य निवडणूक अधिकारी, अधिसभा निवडणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT