पुणे

नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरुच; सकाळपासून तीन घटना

आठवड्यात या पुलाजवळ चार भीषण अपघात घडले आहेत.

विठ्ठल तांबे

पुण्यातील धायरी येथील नवले उड्डाण पुलाजवळ आज पुन्हा अपघाताची नोंद झाली आहे. अपघातांची ही मालिका आठवड्याभरापासून अद्याप सुरुच आहे. आजचा अपघात हा आठवड्यातील पाचवा अपघात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळपासून या ठिकाणी तीन अपघात घडले आहेत. आजच्या अपघातात चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ हा अपघात झाला आहे. एका ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरच्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झालंय आणि कंटेनरचा चालक जखमी झाला आहे. या अपघातात चार वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवले पूर परिसरात वारंवार भीषण स्वरुपाचे अपघात होत असतानाही कोणत्याच उपाययोजना प्रत्यक्षात होत नसल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. 

नवले पूल परिसरात ११ दिवसांत पाच अपघात

  1. या आठवड्यात २१ ऑक्टोबरला झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.

  2. यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ ऑक्टोबरला शुक्रवारी रात्री पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले होते.

  3. यानंतर सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी २३ ऑक्टोबरला सकाळी साडेबाराच्या सुमारास नवले पूल परिसरात ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यानं समोरच्या टेम्पोला आणि दुचाकीला तसेच कारला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या होत्या.

  4. गुरुवारी २८ ऑक्टोबरला पुन्हा या परिसरात अपघात झाला. यामध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास नवले पूल परिसरातील सेल्फी पॉइंटजवळ एका ट्रक चालकानं नियंत्रण सुटल्यानं थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर चालक मात्र जखमी झाला होता.

  5. यानंतर आज ३१ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ट्रेनची बोगी घेऊन निघालेल्या कंटेनरला पाठीमागून एका ट्रकने धडक दिली. या विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले असून ट्रक चालक जखमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT