शरद पवार sakal
पुणे

Pune : युवकांना सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी चांगला वाव; जेष्ठ नेते शरद पवार

भीमाशंकर कारखाना ऊस गाळप दररोज किती होते

डी.के वळसे पाटील

मंचर : “आजोबा सहकार महर्षी माजी आमदार (स्व) दत्तात्रय वळसे पाटील व चुलते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा तुम्हाला वारसा लाभला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे काम अधिक कार्यक्षमतेने करा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक बाजारभाव मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत रहा.तुमच्या सारख्या युवकांना सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी चांगला वाव आहे.”असा सल्ला जेष्ठ नेते शरद पवार यांनी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष अँड प्रदीप वळसे पाटील यांना दिला.

एवढ्या धावपळीतही पवार साहेबांचा सहवास लाभल्याने व त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाल्याने प्रदीप वळसे पाटील भारावून गेले होते.मुंबई येथे सोमवारी (ता.१२) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात जेष्ठ नेते पवार साहेब यांना अँड प्रदीप व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजीव सदस्या पूर्वा वळसे पाटील यांनी आंबेगाव व शिरूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले “तुमचे आजोबा दत्तात्रय वळसे पाटील हे माझे जीवाभावाचे मित्र होते. प्रत्येक वाढदिवसाला ते मला भेटून शुभेच्छा देत होते.समोरच्या व्यक्तीचे आदरतिथ्य कसे करावे. हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा होता.त्यांची परंपरा दिलीप वळसे पाटील यांच्याप्रमाणे प्रदीप व पूर्वा जपत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.”

दरम्यान तेथे हजर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भीमाशंकर कारखाना ऊस गाळप दररोज किती होते?, ऊस कुठून आणता?, साखर साठा किती आहे?, वीज निर्मिती किती होते? याबाबतची माहिती प्रदीप वळसे पाटील यांच्याकडून घेतली. यावेळी आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप लोखंडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT