पुणे

आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून

CD

पुणे, ता. १३ ः प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने धमकी दिल्याने त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. खून केल्याप्रकरणी तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला प्रियकर हा सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी दुर्वांग ऊर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित ऊर्फ अभी संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली. गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तीन मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश यांचा खून झाला होता. गणेश विवाहित असून, त्यांच्या पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार दुर्वांग मानकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. दुर्वांग याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तर गणेश याचे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. दुर्वांगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्याने तिच्यावर दबाव आणला होता. त्याने तरुणीच्या आईला याबाबतची माहिती दिली होती. या कारणावरुन दुर्वांग आणि गणेश यांच्यात तीन महिन्यांपूर्वी वाद झाले होते.
गणेश हे तीन मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हडपसरमधील ससाणेनगर भागात असलेल्या इमारतीच्या परिसरात थांबले होते. त्यावेळी आरोपी दुर्वांग आणि त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी गणेश यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. गणेश यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. खून करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. पसार झालेल्या आरोपींना सापळा लावून वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत (ता. १३) पोलिस कोठडीत सुनावली होती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक अमित शेटे यांनी ही कारवाई केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तामिळनाडूत पक्षफुटीचे लोण! मुख्यमंत्री विजय यांचा AIDMKला धक्का, सहाव्या आमदाराचा राजीनामा; TVKमध्ये प्रवेश करणार

Lionel Messi: कोल्हापूरमध्ये मेस्सीसाठी असा जल्लोष? व्हिडिओ पाहून अर्जेंटिनियन चाहत्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : काँग्रेस आणि समाजवादी पक्ष तुष्टीकरणाच्या राजकारण करण्यात मग्न होते - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Work Culture and Migraine: वर्क कल्चरचा सायलेंट साइड इफेक्ट! ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांमध्ये का वाढतोय मायग्रेन?

Navi Mumbai: कचऱ्यातील भाजीपाला पुन्हा विक्रीस? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT