पुणे

भादलवाडीत महामार्गावर बल्कर उलटला

CD

पळसदेव, ता. २० : पुणे- सोलापूर महामार्गावर भादलवाडी (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (ता. २०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणारा बल्कर (क्र. एम.एच. ४४ यू. ५१९७) उलटला. या अपघातात चालक व वाहक दोघे जखमी झाले. हा अवजड बल्कर बाजूला घेण्यासाठी टोल कंपनीकडे पुरेशा क्षमतेचे क्रेन नसल्याने बल्कर मालक व खासगी क्रेन येईपर्यंत पोलिस यंत्रणेला थांबून रहावे लागले.
महामार्गावरील डाळज क्र. २ गावच्या हद्दीतील उतार ओलांडून भरधाव पुण्याच्या दिशेने चाललेला सिमेंटचा बल्कर भादलवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. त्यानंतर बल्कर घसरत जावून रस्त्यालगत उभा असलेल्या पाण्याच्या टँकरला धडकला. या अपघातात बल्करमधील अविनाश मनोज नाटकर (वय २८) व संदीप मनोज कांबळे (वय २३, दोघे रा. परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड) हे दोघे जखमी झाले.बल्कर चालक पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत बल्कर बाजूला घेण्याचे काम सुरू होते.

बल्करचे वाढते अपघात
पुणे- सोलापूर महामार्गावर महिनाभरापूर्वी पळसदेव येथील रस्त्याच्या दुभाजकांमधील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला सिमेंट वाहतुकीच्या बल्करने धडक दिली होती. या अपघातात महामार्गावर तीन तासांहून अधिक वेळ वाहतुकीची कोंडी झाली. यानंतर आजच्या अपघातात पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर बाहेरच्या बाजूला बल्कर पलटी झाला. मात्र, या दरम्यान रस्त्याच्या दुभाजकाला पाणी घालणाऱ्या टँकरला धडक दिली. महिनाभरात सिमेंटचा बल्कर व पाण्याचा टँकर अपघाताच्या दोन घटना घडल्या. या विचित्र योगायोगाची स्थानिक पातळीवर चर्चा होती. तर अनेकदा सिमेंट वाहतूकीच्या बल्करचे टायर फुटणे, इंजिन नादुरुस्त होणे यांसारख्या घटना घडत असतात.

बल्कर बाजूला घेणे आव्हानात्मक
आजच्या अपघातात पलटी झालेला १६ टायर बल्करमध्ये सिमेंट भरलेले होते. त्यामुळे या बल्करचे वजन ३५ टनांपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. बल्करचे वजन १५ टनांपर्यंत गृहीत धरल्यास एकुण वजन ५० टन होते. एवढ्या अवजड वाहनाला रस्त्यातून बाजूला घेण्यासाठी टोल कंपनीकडे क्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे निघत आहेत. एकीकडे अवजड वाहनांकडून भरमसाठ टोल वसूल केला जात आहे, तर दुसरीकडे अपघात झाल्यानंतर अवजड वाहनांबाबत सुविधांचा अभाव आहे. यामुळे टोल कंपनीच्या या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बाबीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून होणारे दुर्लक्ष इतर वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. टोल कंपनीकडे अवजड वाहने बाजूला घेण्यासाठी अत्याधुनिक हायड्रा क्रेनची आवश्यता असून, आपत्कालीन यंत्रणेत या क्रेनचा समावेश करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT