SRTM System Sakal
पुणे

SRTM System : तेल, वायूंच्या साठ्याचा शोधासाठी उपयुक्त स्वदेशी प्रणाली

भूकंपीय माहिती (डेटा) वापरून भूपृष्ठाच्या संरचनेची प्रतिमा काढण्यासाठी आता देशात पूर्णपणे स्वदेशी असणारे ‘सिस्‌आरटीएम’ म्हणजेच एचपीसी सिस्मिक इमेजिंग सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

भूकंपीय माहिती (डेटा) वापरून भूपृष्ठाच्या संरचनेची प्रतिमा काढण्यासाठी आता देशात पूर्णपणे स्वदेशी असणारे ‘सिस्‌आरटीएम’ म्हणजेच एचपीसी सिस्मिक इमेजिंग सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे.

पुणे - भूकंपीय माहिती (डेटा) वापरून भूपृष्ठाच्या संरचनेची प्रतिमा काढण्यासाठी आता देशात पूर्णपणे स्वदेशी असणारे ‘सिस्‌आरटीएम’ म्हणजेच एचपीसी सिस्मिक इमेजिंग सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. भूगर्भातील तेल आणि वायूच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी ही सॉफ्टवेअर प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या वतीने हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘सी-डॅक’तर्फे ‘सिस्मिक इमेजिंग : पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली पाहणे’ विषयावर शुक्रवारी (ता. २८) कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेत ‘सी-डॅक’चे महासंचालक ई. मगेश, कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ (निवृत्त), ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे सुभाष चांद, सुनीता वर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. हे सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या प्रक्रियेत तेल आणि वायू कंपन्या, संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत अपेक्षा, आव्हाने आणि भविष्यातील उपाययोजना जाणून घेण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

हायड्रोकार्बन्सच्या ड्रिलिंगच्या स्थानांबद्दल निर्णय घेण्यासाठी या प्रतिमा आवश्यक असतात. आरटीएम हे भूकंपीय डेटा वापरून भूषृष्ठाच्या संरचनेची प्रतिमा काढण्यासाठी प्रभावी ठरते, परंतु सध्या स्वदेशी आरटीएम सॉफ्टवेअर देशात उपलब्ध नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा प्रकारचे सॉफ्टवेअर अत्यंत महागडे आहे. त्यामुळे आता ‘सी-डॅक’मध्ये अशा ‘सिस्‌आरटीए’ सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती ‘सी-डॅक’चे महासंचालक इ. मगेश आणि सहयोगी संचालक रिचा रस्तोगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘सिस्‌आरटीएम’साठी १४ कोटी रुपये

  • नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत हे सॉफ्टवेअर विकसित

  • ‘सी-डॅक, पुणे’सह ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (डेहराडून), भारतीय तंत्रज्ञान संस्था (रूरकी) यांचा सहभाग

  • सॉफ्टवेअर वर्षभरात पूर्णत्वास येणार

  • सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी १४ कोटी रुपयांचा निधी

अशी तयार होते प्रतिमा

जमिनीवर किंवा सागरी वातावरणात तेल आणि वायूच्या साठ्यांचा शोध घेण्याकरिता भूकंपादरम्यान पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील स्थिती पाहण्यात येते. यासाठी भूकंपीय अन्वेषणाची सर्वेक्षणे केली जातात. त्यातील नोंदीच्या, माहितीच्या आधारावर पृथ्वीच्या पृष्ठभागाची प्रतिमा तयार करण्याची प्रक्रिया करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'पिक्सिस पायोनियर' जहाज LPG घेऊन मंगळूर बंदरात दाखल

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT