पुणे

Crime : पुण्यातील प्रसिद्ध 'सुकांता' थाळी दोघांना पडली तब्बल 5 लाखांना; वाचा काय घडलं

सकाळ डिजिटल टीम

Sukanta Thali News : पुण्यातील प्रसिद्ध असलेली सुकांता थाळी सर्वांनाच माहिती आहे. येथील थाळीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण येथे गर्दी करत असतात. मात्र, याच चविष्ट अशा थाळीचा आनंद घेणे दोन नागरिकांना चांगलच महागात पडलं आहे. सुकांता थाळी पार्सल सेवा देतो सांगत सायबर चोरट्यांनी पुण्यातील दोघांना ५ लाखांचा गंडा घातला आहे. या संदर्भात येरवडा पोलीस ठाणे आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेची शहरभर जोरदार चर्चा सुरू असून, पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आचारी (४४, येरवडा) यांनी सुकांता थाळीची जाहिरात पाहून दिलेल्या नंबरवर फोन केला. थाळी घरपोच मिळेल त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करा आणि त्यावर क्रेडिट कार्डची माहिती भरा असे सांगण्यात आले. आचारी यांनी कार्डचा नंबर टाकला आणि त्यांच्या बँकेतून ३.४० लाख रुपये काढण्यात आले. असाच प्रकार कोरेगाव पार्क भागात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील खंडेलवाल (३९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खंडेलवाल यांच्या पत्नीने या थाळीची जाहिरात सोशल मीडियावर पाहिली होती. त्यानुसार त्यांनीदेखील दिलेल्या नंबरवर फोन केला असता त्यांनादेखील प डाऊनलोड करून कार्डची माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यांनीदेखील कार्डची माहिती टाकली असात त्यांच्या खात्यातून १.५२ लाख रुपये गायब करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, नेमके हे सायबर चोरटे कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT