Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News: ATM मशीन चोरट्यांनी पळवलं सुपे येथील घटना

रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांनी पाहिले असता सेंटर चालू होते

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : पैशांचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील सुपे येथे शुक्रवार ता. १० पहाटे घडला. येथिल बस स्थानक परिसरात इंडी कॅश कंपनीचे एटीएम सेंटर आहे.

रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांनी पाहिले असता सेंटर चालू होते अज्ञात चोरट्यांनी पहाटे मशीनच उचलून वाहनात भरून पळवून नेले चालू वाहनातच मशीन फोडले याचे काही तुकडे सुमारे सात किलोमीटर अंतरावरील नारळी गावच्या हद्दीत सापडले आहेत.

तर पुणे सोलापूर महामार्गावरील रावणगाव गावच्या हद्दीत मशीनची तिजोरीचा भाग पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मशीनमध्ये सुमारे साडेसात लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळाची उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी पाहणी केली असून तांत्रिक माहितीच्या आधारे शोधकार्य सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT