पुणे

कचऱ्याच्या विळख्यात अडकलाय स्वारगेट चौक

महेश जगताप

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वारगेट चौकामधील जेधे उड्डाण पुलाखाली कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

स्वारगेट - शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वारगेट चौकामधील जेधे उड्डाण पुलाखाली कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकणी कित्येक दिवसाचा कचरा साठला असल्याने या भागात दुर्गंधीही मोठ्या प्रमाणत पसरली आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

स्वारगेट चौकात शेजारीच बस स्थानक व हा चौक शहराचा मध्यवर्ती असल्याने दररोज लाखो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, या चौकातील उड्डाणपुलाखाली सगळीकडे कचरा पसरला असल्याने नाकाला हात लावून या ठिकाणाहून जावे लागते त्याचबरोबर पावसाचे ही दिवस असल्याने रोगराई होण्याचा संभव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.

या ठिकाणी, या उड्डाणपुलाच्या बाजूलाच राहणारे स्थानिक नागरिकही आपल्या घरातील कचरा या ठिकाणी टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर स्थानिक व्यापारी व हॉटेल व्यवसायिकही याच ठिकाणी कचरा टाकत असतात. मात्र, याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे असे नागरिकांनी सकाळशी बोलताना सांगितले.

मी वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधूनही गेल्या काही महिन्यापासून स्वारगेट चौकाकडे आरोग्य विभागाचे लक्ष नाही. या ठिकाणी अनेक दिवसाचा कचरा असल्या कारणाने मोठी दुर्गंधी तयार झाली आहे .

- प्रताप ठिगळे (स्थानिक नागरिक)

मी कामानिमित्त आठवड्यातून चार ते पाच दिवस स्वारगेट चौकातून प्रवास करीत असते. मात्र या चौकातून प्रवास करीत असताना प्रचंड वास येतो व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा निदर्शनास येतो.

- स्नेहल जाधव (प्रवासी)

मी तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वारगेट चौक साफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे सातत्याने या चौकात लक्ष ठेवणार आहे .पुन्हा असा प्रकार होणार नाही. नागरिकांनाही विनंती आहे की रस्त्यावर कचरा टाकू नये.

- अमित घाग (आरोग्य निरीक्षक - कसबा क्षेत्रीय कार्यालय)

* आरोग्य विभागाने सातत्याने लक्ष देण्याची गरज

* जवळच बसस्थानक असल्याने प्रवाशांचा ही कचरा करण्यात मोठा हातभार

* स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा करतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार X Factor? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT