Pune techie's murder: Police arrest Bengaluru-based friend
Pune techie's murder: Police arrest Bengaluru-based friend 
पुणे

पुणे: अभियंता तरुणीच्या खूनप्रकरणी एकास अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - संगणक अभियंता अंतरा देबानंद दास (वय 23) हिचा खून केल्याच्या संशयावरून तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याला बंगळूर येथून ताब्यात घेतले होते.

संतोषकुमार अखिलेश प्रसाद गुप्ता (वय 24, रा. आरा, भोजपूर, बिहार) असे त्याचे नाव आहे. तो बंगळूर येथे आयटी कंपनीत कामाला होता. त्यावेळी त्याची अंतराशी मैत्री झाली होती. त्याने एकतर्फी प्रेमातून मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

अंतरा ही मूळ पश्‍चिम बंगालची असून, ती सहा महिन्यांपूर्वी तळवडे येथील कॅपजेमिनी आयटी कंपनीत रुजू झाली. ती प्राधिकरण येथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. तळवडे येथे शुक्रवारी रात्री अंतराच्या डोक्‍यावर हत्याराने वार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी देहू रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

संतोषकुमार हा अंतराला त्रास देत होता, अशी माहिती तिच्या कुटुंबीयानी पोलिसांना दिली होती. या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचे पथक सोमवारी बंगळूरला गेले होते. या पथकाने तेथून संतोषकुमार याला ताब्यात घेतले. त्याला बुधवारी पुण्यात आणून चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सतिश होडगर, शंकर जम, सतिश कुदळे, गणेश महाडिक, सुनील जावळे, देहू रोडचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे, प्रकाश अहिवळे, बाळासाहेब अहिवळे यांनी ही संयुक्‍त कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT