Temperature
Temperature Sakal
पुणे

पुण्याचा पारा सोमवारी पुन्हा @ ४०

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरात २४ तासांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे. सूर्य आग ओकत असून, कमाल तापमान पुन्हा एकदा ४० अंशांच्या घरात पोहोचला आहे.

पुणे - पुणे शहरात २४ तासांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे. सूर्य आग ओकत असून, कमाल तापमान पुन्हा एकदा ४० अंशांच्या घरात पोहोचला आहे. पुढील दोन दिवस पुणे व परिसरात पारा चाळिशीवर स्थिर राहणार आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा असह्य होणार आहेत.

पुणे शहरात सोमवारी ४०.८ अंश सेल्सिअस, तर लोहगाव येथे ४०.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात झपाट्याने सरासरीपेक्षा झालेली वाढ यामुळे सोमवारी दिवसा उन्हाचा चटका चांगलाच जाणवला. मागील आठवड्यात उन्हापासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पारा पुन्हा चढू लागला आहे.

राज्यात एकीकडे विजांच्या कडकडाटासह पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असले, तरी पुण्यात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा इशारा

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आला आहे. सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्‍वर येथे १८.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. राज्यात कोकण वगळता बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान सध्या ४० अंशांच्या पुढे आहे. विदर्भातही कमाल तापमानात हळू हळू घट होत असून, पावसासाठी अनुकूल वातावरण होत असल्यानेही कमाल तापमानात काहीशी घट कायम राहणार आहे. परिणामी उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळेल. सध्या नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानात दाखल झाले आहेत. त्यातच तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे, तर मध्य प्रदेश ते तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी राज्यात पूर्वमोसमी पावसासाठीचे वातावरण निर्माण होत आहे.

गेल्या दोन दिवसांतील पुण्यातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये

  • रविवार (ता. १५) - ३७.६

  • सोमवार (ता. १६) - ४०.८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT