पुणे : रोखलेल्या श्वासांनी रंगमंच जीवंत झाला Sakal
पुणे

पुणे : रोखलेल्या श्वासांनी रंगमंच जीवंत झाला

लॉकडाउनच्या दीर्घ सावटानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा नाटकाची तिसरी घंटा वाजली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हशा, टाळ्या आणि रोखलेल्या श्वासांनी सभागृहातील समूहाबरोबरच रंगमंचालाही जीवंत केले. लॉकडाउनच्या दीर्घ सावटानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा नाटकाची तिसरी घंटा वाजली, अन पुणेकरांच्या सांस्कृतिक नाट्याविष्काराला शुभारंभ झाला.

विद्यापीठातील ललित कला केंद्र (गुरूकुल) विस्तार कार्यक्रमांतर्गत वाघाची गोष्ट या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी सादर करण्यात आला होता. विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विभाकर निरस्कर यांनी तिसरी घंटा वाजवत प्रयोगाचा शुभारंभ केला. मुळ इटालियन भाषेतील हे ‘दारिओ फो’ या नोबेल पुरस्कार विज्येत्या नाटककाराने लिहीले असून, त्याचा मराठी अनुवाद विभागाचा माजी विद्यार्थी विनोद लव्हेकर याने केला आहे. प्रयोगाचे दिग्दर्शन महेश खंदारे याने केले. तर शुभम साठे आणि ऋत्विक तळवलकर यांनी या नाटकात अभिनय केला आहे. मुळ एकपात्री असलेला हा प्रयोग विभागाचे विद्यार्थी अभिनव पद्धतीने द्विपात्रीमध्ये सादर करतात. चीन मधील क्रांती, सत्ता आणि पक्षीय राजकारणाच्या मनोभुमीकेवर हलकेच भाष्य करणारा आशय या काल्पनिक गोष्टीला लाभला आहे. मुळ नाटकात अलगदपणे डोकावणारे भारतातील आजचे संदर्भ प्रेक्षक, नट, नाटकाचा कालावधी आणि सदर्भांतील अंतर नष्ट करतात.

विद्यार्थ्यांचे ‘नाटक १० बाय २०’

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाट्यगृहे, रंगमंच दीर्घकाळ बंद होते. भविष्यातही किती काळ हे खुले राहतील हे सांगता येत नाही. म्हणून गुरूकुलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नाटक १० बाय २०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिथे १० बाय २० एवढ्या आकाराची जागा आहे. असा चौक, सोसायटीची पार्कींग, गावातील चावडी, पाड्यावरची जागा आदी ठिकाणी नाटक सादर करण्यात येणार आहे. लोकांनी दिलेल्या ऐच्छिक देणगीवर नाटकाचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती खंदारे यांनी दिली. यासाठी ८८७९३०७८५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘‘दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर व्यक्तिगत पातळीवरील मनोरंजनाचा आनंद आज खऱ्या अर्थाने सामुहिक झाला आहे. नाटक ही समुहाने आस्वाद घेण्याची कला आहे. ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत पुण्याबाहेरही राज्यात जिथे शक्य होईल तिथे हे प्रयोग सादर केले जाणार आहे.

- डॉ. प्रविण भोळे, विभागप्रमुख, ललित कला केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo विमानाचं हवेतच इंजिन बंद; २२४ जणांचा जीव टांगणीला, पुढच्या काही मिनिटांत घडलं थरारक

Rocky Flintoff : २० षटकार, ४३ चौकार... अँड्य्रू फ्लिंटॉफच्या मुलाचे वादळी शतक... रॉकीने संघाला मिळवून दिला १७४ धावांनी विजय

दादरच्या स्टार मॉलमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय, २० ते ३० वर्षांच्या ६ तरुणींची सुटका; छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

Gold Price Record High : सोन्याच्या दराचा भडका! दोन दिवसात तब्बल १५ हजारांनी महाग, दरवाढीमागे नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT