Pune Undri
Pune Undri 
पुणे

Pune : भिंताडेनगर-सोमजी रस्त्यालगतची विहीर मृत्यूची घंटा

अशोक बालगुडे

उंड्री : उंड्री-पिसोळी (ता. हवेली) शिवेवरील भिंताडेनगर-सोमजी पीएमपी बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची विहिर वाहनचालकांसाठी मृत्यूची घंटा ठरत आहे. या रस्त्याने स्कूल बस आणि नोकरदारवर्गाची मोठी वर्दळ असते. त्यामुळे विहिरीला कठडा बसवावा, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची तक्रार नोकरदार-पालक विद्यार्थ्यांनी केली.

उंड्रीतील भिंताडेनगर-सोमजी बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तक्रारीची दखल घेऊन पालिकेच्या पथ विभागातील सचिन बिडवे व अभिजित सूर्यवंशी यांना घटनास्थळी येऊन पाहणी केली. संबंधित विहीर मालकाला नोटीस देऊन तातडीने सुरक्षा व्यवस्था केली जाईल, असे काशिनाथ भिंताडे यांनी सांगितले.

भिंताडेनगर-सोमजी बसस्थानक मार्गे कोंढव्याकडे जामाऱ्या रस्त्याने हिल ग्रिन स्कुल, संस्कृती स्कुल, बिशप्स स्कुलमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसेस धावतात. बाह्यवळण मार्गावरील गर्दीतून जाण्याऐवजी जवळचा मार्ग म्हणून नोकरदार-कामगार या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठडे बसवावेत.

- राजेंद्र भिंताडे, रोहन पाटील, उंड्री

दरम्यान, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे म्हणाल्या की, विहिरीच्या मालकाला वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षा जाळी किंवा कठडा उभारावा, असे पत्र दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT