Pune University Chowk traffic Sakal
पुणे

Pune University Traffic : पुणे विद्यापीठासमोरील वाहतूक कोंडी कधी सुटणार?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंदऋषिजी महाराज चौक परिसरात सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंदऋषिजी महाराज चौक परिसरात सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. सेनापती बापट रस्ता जंक्शनजवळ रात्री दहा वाजेपर्यंत कोंडी होती. त्यामुळे वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामांमुळे गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू असते. या रस्त्यावर सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहनांची संख्या अधिक असते.

या वेळी दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शिवाजीनगर ते बाणेर, औंध आणि पाषाणकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांसाठी पर्यायी मार्ग आणि रस्ता रुंदीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विद्यापीठासमोरील चौकात सध्या मेट्रोचे तीन पिलर टाकण्याचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडून जुनी पाइपलाइन बदलण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच खडकी रेल्वे स्थानकाच्या मागे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामांमुळे विद्यापीठ चौकातील वाहतुकीवर परिणाम होत आहे.

दरम्यान, सेनापती बापट रस्ता जंक्शनपासून औंध आणि बाणेर-पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र लेन सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गुरुवारपर्यंत आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT