Pune University ABVP 
पुणे

Pune University : विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची गैरसोय : शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?

विद्यापीठातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळावे यासाठी अभाविपचे आंदोलन

ओंकार जाधव

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अजुन पर्यंत हॉस्टेल मिळाले नाही. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन ३ महिने झाले तरी त्यांच्या राहण्याची सोय विद्यापीठाकडून होत नाही. त्यांना पाहिजे त्या सुविधांचा लाभ घेता येत नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्तित होत आहे.

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली परंतु या मागण्यांकडे विद्यापीठाचे कुलसचिव यांचे दुर्लक्ष होत आहे. विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जगभरातून विध्यार्थी येतात. सामान्य परिस्थितीतील विध्यार्थी हे बाहेर खोल्या करुन राहू शकत नाहीत. बरेच विध्यार्थी कमवा व शिका योजने अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांची परिक्षा सुरु आहेत आश्या परिस्थिती मध्ये त्यांना हॉस्टेल मधून बाहेर कडण्यात आले यात विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना जो पर्यंत हॉस्टेल मिळत नाही तो पर्यंत बायोमेट्रिक उपकरन शिथिल करण्यात यावे अशी विनंती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कुलसचिव यांना करण्यात आली होती. मात्र ही मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज विद्यार्थांना रस्त्यावर झोपन्याची वेळ आलेली आहे. विद्यार्थांची होणारी गैरसोय आणि विद्यापीठ प्रशासन कडून होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे अभाविप कडून आंदोलन करण्यात आले. व याला जबाबदार विद्यापीठ प्रशासन आहे असा संताप व्यक्त केला.

भारतातील नामांकित विद्यापिठात विद्यार्थ्यांचे अश्या प्रकारे हाल होणे हे विद्यापिठाच्या प्रतिमेला काळीमा फासणारी बाब आहे. आणि या ढसाळ कारभाराला विद्यापीठ प्रशासन जबादार आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालकत्वाची भूमिका घ्यायला हवी होती पण त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर येऊन विद्यार्थांच्या आडचनी देखील समजून घेण्याची गरज समजली नाही. लवकरात लवकर हॉस्टेल प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा अभाविप अजुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

- महादेव रंगा, अभाविप विद्यापीठ अध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT