Crime News esakal
पुणे

केस कापण्यासाठी आलेल्या सात वर्षीय मुलावर सलूनमधील मुलाकडून अनैसर्गिक कृत्य

केस कापण्यासाठी आलेल्या सात वर्षीय मुलावर सलूनमध्ये काम करणाऱ्या कामगाराने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

केस कापण्यासाठी आलेल्या सात वर्षीय मुलावर सलूनमध्ये काम करणाऱ्या कामगाराने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - केस कापण्यासाठी आलेल्या सात वर्षीय मुलावर सलूनमध्ये काम करणाऱ्या कामगाराने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी संशयित आरोपीस तत्काळ अटक केली. हि घटना सोमवारी सकाळी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सज्जन सहेआलम सलमानी (वय 20, रा. संतनगर, लोहगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलाच्या वडीलांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सलमानी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्‍सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलाची आई त्यांच्या सात वर्षाच्या मुलाला केस कापण्यासाठी सोमवारी सकाळी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तेथे गर्दी असल्यामुळे जास्त वेळ लागणार असल्याने मुलाला तेथेच ठेवून आई घरी आली.

दरम्यान, सलूनमध्ये काम करणाऱ्या सलमानी याने दुकानीतल गर्दी संपल्यानंतर मुलाशी अश्‍लिल चाळे करीत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर त्याने मुलाचे केस कापून त्यास घरी पाठवून दिले. घरी पोचल्यानंतर मुलाने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्याच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विमानतळ पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये खुला केला जाईल

Success Story : एका मिस्ड कॉलने बदलले नशीब! भारतीय इंजिनिअरने अमेरिकेत उभी केली 8300 कोटी रुपयांची AI कंपनी, नेमकं कसं केलं पाहा

SCROLL FOR NEXT