Pune Viral Video Sakal
पुणे

Pune Viral Video : पुणे की हॅरी पॉटरचं हॉगवर्ट्झ? पावसाने अशी अवस्था केली की...

पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

हॅरी पॉटर चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्यामध्ये तो हॅरी किंवा हॉगवर्ट्समधली मुलं काहीतरी चुकीचा मंत्र म्हणतात आणि सगळा गोंधळ उडतो. वादळ येतं, किंवा जमीन हलू लागते. असंच एक वादळ काल पुण्यात आलं होतं. पण ही कोणती जादू नव्हती. मग काय होतं हे?

खाली दिलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हे नक्कीच पिक्चरमधलं एखादं दृश्य आहे असं वाटेल. पण तसं नाहीये. हे खरंच घडलंय आणि तेही पुण्यात. पुण्यात काल पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सकाळी लख्ख ऊन पडलं होतं, पावसाचा मागमूसही नव्हता. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पुण्यात हाहाकार माजला.

अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं पडली होती. ठिकठिकाणी वाहतूक खोळंबली होती. प्रचंड वारा वाहत होता. आणि त्यामुळेच पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या व्हिडीओमधल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. कालच्या पावसामुळे जिल्हाधिकाऱी कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे. कार्यालयात फायली या वाऱ्यामुळे अक्षरशः उडून गेल्या. शिवाय, कार्यालय परिसरात मोठी झाडंही पडली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT